विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी घडवलेली शिल्पं इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्षं अबाधित राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सुतार यांचा गौरव केला. सुतार यांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. उत्तर प्रदेशात नोएडा इथं सुतार यांच्या निवासस्थानी झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राम सुतार यांनी आपल्या शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढवला आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
Site Admin | November 15, 2025 5:41 PM | ram sutar devendra fadanvis
शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान