देशाच्या एकतेचं निदर्शक असलेल्या हर घर तिरंगा अभियानानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. ठिकठिकाणी तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात येत आहेत तसंच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.
पनवेल महानगर पालिकेमार्फत ‘हर घर तिरंगा’ मोहिम विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत नुकतीच महापालिका कार्यक्षेत्रातल्या विविध शाळा महाविद्यालयांमध्ये पत्रलेखन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, प्रतिज्ञा घेण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल होतं. या रॅलीत सावंतवाडी शहरातले सर्वपक्षीय पदाधिकारी, विद्यार्थी, रिक्षा संघटना, सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
नाशिक जिल्ह्यात काढलेल्या तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या चंचल ठाकुर हिने आपलं मनोगत व्यक्त केलं
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने आज हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत डीआरएम कार्यालय ते सोलापूर रेल्वे स्टेशनपर्यंत तिरंगा यात्रा आयोजित केली.
लातूर महानगर पालिकेतर्फे लातूर शहरात मोटार सायकल रॅली काढण्यात आली.