राज्यसभेत ‘अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक, २०२५’ वर चर्चा

राज्यसभेत आज ‘अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक, २०२५’ वर चर्चा सुरु झाली. लोकसभेत काल हे विधेयक मंजूर झालं होतं. अणु ऊर्जेचा विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी अणुऊर्जा निर्मितीमध्ये किरणोत्साराचं आयनीकरण, तसंच अणुऊर्जेच्या सुरक्षित वापरासाठी मजबूत नियामक चौकट निर्माण करणं, हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे.   

 

‘कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि पक्षाघात प्रतिबंध आणि नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रम’ हा केंद्रसरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, या अंतर्गत देशभरातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावर उपचार दिले जातील, असं प्रधानमंत्री कार्यालयाचे  राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. 

 

येत्या ३ वर्षांत जिल्हा रुग्णालयांमध्ये ३७२ ‘डे केअर कॅन्सर सेंटर’ स्थापन करण्याची सरकारची योजना असून, त्यापैकी २०० सेंटर्स २०२५-२६ या आर्थिक वर्षात स्थापन केली जातील, असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.