राज्यसभेतही विरोधकांनी विविध मुद्द्यांवर घोषणाबाजी केली. आपल्याकडे ३० स्थगन प्रस्ताव आले असून ते फेटाळत असल्याचं उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं. बिहारमधल्या मतदार याद्या पुनरिक्षणावर चर्चा घेता येणार नाही कारण निवडणूक आयोग संवैधानक संस्था आहे आणि हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे असं हरिवंश यांनी स्पष्ट केलं. मात्र विरोधकांच्या घोषणा चालूच राहील्यानं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.
Site Admin | August 1, 2025 1:16 PM | Monsoon Session 2025 | Rajyasabha
राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
