डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मनरेगा अंतर्गंत मजुरांना वेतन आणि कामाच्या दिवसांची संख्या वाढवण्याची सोनिया गांधींची मागणी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा – मनरेगा अंतर्गंत मजुरांना कायद्यानुसार किमान वेतन आणि त्यांच्या कामाच्या दिवसांची संख्या वाढवण्याची मागणी खासदार सोनिया गांधी यांनी राज्यसभेत शून्य प्रहारात केली. 

 

केंद्र सरकार मनरेगा पद्धतशीरपणे कमकुवत करत असल्याचा आरोपही गांधी यांनी यावेळी केला. गरीबांसाठी वरदान ठरलेली मनरेगा योजना पुढं चालू ठेवण्यासाठी तसंच त्याची  व्याप्ती वाढवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.