गेल्या दहा वर्षांत देशाच्या कृषी उत्पादनात ४४ टक्के वाढ झाली असून, हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यांनी ही माहिती दिली.
बियाण्याचं नवं वाण, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीच्या सुधारित पद्धतींचा वापर यामुळे हे शक्य झाल्याचं ते यावेळी म्हणाले. कृषी क्षेत्राचा व्यापक विस्तार करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.