विमान उपकरणं हितसंबंध संरक्षण विधेयक २०२५ आज राज्यसभेत मंजूर झालं. भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजार असलेला देश असल्याचं, विधेयकावरल्या चर्चेला उत्तर देताना नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं. गेल्या दहा वर्षांत विमान वाहतूक क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे, असं ते म्हणाले.
त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक आज राज्यसभेत विचारार्थ आणि मंजुरीसाठी मांडण्यात आलं. आनंद ग्रामीण व्यवस्थापन संस्थेला त्रिभुवन विद्यापीठ म्हणून प्रस्थापित करणं हा या विधेयकाचा हेतू आहे. ही संस्था सहकार क्षेत्रात प्रशिक्षण देण्याचं काम करेल.
लोकसभेत कोस्टल शिपिंग विधेयक २०२४ विचारार्थ मांडण्यात आलं. कोस्टल शिपिंगचं नियमन, किनारी व्यापाराला प्रोत्साहन देणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे.