न्यायमूर्ती वर्मा प्रकरणी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांची चिंता व्यक्त

न्यायमूर्ती वर्मा प्रकरणी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात आज त्यांनी सभागृह नेते जे पी नड्डा आणि विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांची बैठक घेतली. या प्रकरणी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी तातडीने पावलं उचलल्याबद्दल धनखड यांनी प्रशंसा केली. तसंच सभागृहात याविषयी चर्चेचं आमंत्रण देऊ असं सांगितलं.