December 1, 2025 7:48 PM | Rajyasabha

printer

राज्यसभेत कामकाज उद्यापर्यंत तहकूब

राज्यसभेत आज ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली. नॅशनल कॉन्फरन्सचे गुरविंदर सिंग ओबेरॉय, चौधरी मोहम्मद रमजान आणि सज्जाद अहमद किचलू यांनी वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून शपथ घेतली. पहिल्यांदाच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवणारे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांचं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपतीपदापर्यंतचा प्रवास लोकशाहीची खरी ताकद दर्शवतो असं मोदी यावेळी म्हणाले.

 

राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राधाकृष्णन हे निःपक्षपातीपणे वागणूक देतील, अशी आशा व्यक्त केली. त्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाजही २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अनुदानाची मागणी सादर केली. मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी चर्चेची मागणी केली. त्यावर उत्तर देताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलं. मात्र, या उत्तराने समाधान न झाल्यामुळे विरोधकांना सभात्याग केला. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.