राज्यसभेत दोन दिवस राज्यघटनेवर विशेष चर्चा

राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यघटनेवरील विशेष चर्चा आज राज्यसभेत सुरू होईल. भाजपानं आपल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी करुन सर्व खासदारांनी आज आणि उद्या राज्यसभेत हजर राहावं असे आदेश दिले आहेत.