संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे आधी दुपारी बारा आणि नंतर दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब झालं. नंतरही गदारोळ चालूच राहिला आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.