डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यसभेतून विरोधी सदस्यांचा सभात्याग

काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी काल लोकसभेत जमीन हडपल्याचा आरोप केला होता. या  निषेधार्थ आज विरोधी सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला. अनुराग ठाकूर यांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

 

राज्यसभेत अशा प्रकारे कोणाचीही प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये अशी अपेक्षा राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी आचारसंहिता समितीला या संदर्भात निश्चित पद्धती निर्माण करावी  असं आवाहनही केले.  सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकलेले मुद्दे संघर्षाचे कारण होऊ नये असंही ते म्हणाले. त्यानंतर विरोधी पक्ष सदस्य़ानी सभात्याग केला. 

 

दरम्यान देशात अल्पसंख्यांकांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ काँग्रेसचे केरळमधील खासदार आणि इतर विरोधी सदस्यांनी लोकसभेतूनही सभात्याग केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.