August 30, 2024 7:25 PM

printer

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची राज्य सरकारवर टीका

येत्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा या हेतूनेच निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. ते आज लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. एकिकडे सरकार प्रगतीशील शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी पैसे नसल्याचं सांगतं मात्र लाडकी बहीण योजनेसाठी त्यांच्याकडे पैसे कुठून येतात, असा प्रश्नही शेट्टी यांनी यावेळी विचारला.