डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राजस्थानात मद्यधुंद चालकामुळे ९ जणं चिरडून ठार, तर ६ जण गंभीर जखमी

राजस्थानात जयपूरच्या नाहरगडमध्ये काल रात्री मद्यधुंद चालकानं ९ जणांना चिरडून ठार केलं तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं असून आतापर्यंत दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.  खबरदारीचा उपाय म्हणून या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.