जग अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात असल्याने देशातल्या युवकांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार रहावं असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रीय छात्रसेनेच्या शिबिरात बोलत होते. एन सी सी केवळ संचलन आणि शिबिरापुरते मर्यादित नसून शिस्त आणि देशभक्ती अंगी भिनवण्यासाठी तसंच स्वयं सुधारणेसाठी एक मंच असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | January 24, 2026 4:53 PM | Rajnath Singh
देशातल्या युवकांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार रहावं -मंत्री राजनाथ सिंह