November 25, 2025 3:35 PM

printer

भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचं प्रत्येक जहाज आत्मनिर्भरतेचं प्रतीक- संरक्षण मंत्री

भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचं प्रत्येक नवीन जहाज पूर्णपणे भारतात तयार होत असून देशाच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज समुद्र उत्कर्ष परिसंवादात ते बोलत होते.

 

देशाचा ९५ टक्के व्यापार समुद्रमार्गे होतो असं त्यांनी सांगितलं. भारतीय गोद्यांमधे आता बहुउद्देशीय जहाजंही तयार होत आहेत असं सांगून ते म्हणाले की, हिंद -प्रशांत महासागर क्षेत्रात जहाजांचा आसरा आणि दुरुस्तीचं केंद्र भारतात व्हावं, असं उद्दिष्ट आहे.