संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, काल रात्री त्यांचं पुण्यात आगमन झालं. आज सकाळी सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
तसंच डीआरडीओ इथं संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर ते नाशिकला रवाना होती. नाशिकमध्ये स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस एमके-वन ए’ या लढाऊ विमानाच्या उत्पादनाच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल, तसंच ओझर मिनी स्मार्ट टाऊनशिपचं उद्घाटनही राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे.