संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत ब्राझीलचे उपाध्यक्ष गेराल्डो अल्कमिन यांची भेट घेणार आहेत. यावेळी ब्राझीलचे संरक्षण मंत्री जोसे मुसिओ मोंटेइरो फिल्हो हे देखील उपस्थित राहणार आहेत.
या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संरक्षण क्षेत्रातील बहुआयामी संबंधांचा आढावा घेतला जाईल. तसंच दोन्ही नेते लष्करी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्य यासारख्या क्षेत्रांबद्दलही सविस्तर चर्चा करतील, असं संरक्षण मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.