नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीला प्रोत्साहन देऊन आणि स्थानिक कंपन्यांना वाढीसाठी पोषक वातावरण तयार करुन एक मजबूत संरक्षण यंत्रणा देश तयार करत आहे, असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात केलं.
पाचव्या पिढीचं लढाऊ विमान आणि विमानांचं इंजिन तयार करणं तयार करायच्या दिशेनं भारताचा प्रवास सुरू आहे, असंही सिंह यांनी सांगितलं. सर्व परदेशी कंपन्या आणि गुंतवणूकदारांनी भारतातल्या संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करावी, असं आवाहन त्यांनी केलं.