ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे, जगभरात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मागणी वाढली असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल सांगितलं.
लखनौ इथं उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्र भानू गुप्ता यांच्या पुतळ्याचं अनावरण सिंग यांच्या हस्त झालं त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या 14 देशांनी याविषयी चौकशी केल्याचे सांगून, लखनौ इथून आता क्षेपणास्त्राची निर्यात होऊ शकेल ज्यामुळे रोजगारवाढीस मदत होईल असेही ते यावेळी म्हणाले.