डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

चेन्नईतल्या भारतीय तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयातील प्रादेशिक सागरी प्रदूषण प्रतिसाद केंद्राचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल चेन्नईतल्या भारतीय तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयातील प्रादेशिक सागरी प्रदूषण प्रतिसाद केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. प्रादेशिक सागरी प्रतिसाद केंद्र तेल गळतीच्या प्रतिसादासाठी एकात्मिक दृष्टीकोन सुनिश्चित करून या भागातील देशांमध्ये समन्वय सुलभ करेल. यामुळे तेल गळतीला अधिक एकजुटीने प्रभावी प्रतिसाद देता येऊ शकेल तसंच त्यासाठीची खास उपकरणं आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध होण्यास मदत होण्यासोबतच त्यावर प्रत्येक देशाला वैयक्तिकरीत्या शक्य नसलेले नावीन्यपूर्ण तांत्रिक उपाय देखील काढता येऊ शकतील. या अनुषंगानं ASEAN देशांतील 20 परदेशी कर्मचाऱ्यांचं पहिल्या आणि दुसऱ्या पातळीवरचं प्रशिक्षण आजपासून दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी आयोजित करण्यात आलं आहे.