देशाला संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणं हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शिवा – सावंगा परिसरात स्थापन केलेल्या मीडियम कॅलिबर ऍम्युनिशन फॅसिलीटी इथं पिनाका गायडेड रॅकेटचं पहिलं उत्पादन पाठवण्यात आलं, यावेळी संरक्षण मंत्री उपस्थित होते. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.