जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना भारतात मात्र अभूतपूर्व स्थैर्य असून विकसित राष्ट्र होण्याकडे भारताची वेगवान वाटचाल सुरू असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते राजकोट इथे, कच्छ आणि सौराष्ट्र प्रदेशासाठीच्या व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत बोलत होते.
(कच्छ आणि सौराष्ट्रमधे गुंतवणूक करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी गुंतवणूकदारांना केलं. कच्छ आणि सौराष्ट्र हे उत्पादकतेचं प्रमुख केंद्र म्हणून उदयाला आलं आहे, कच्छमधे ३० गिगावॉटचं क्लीन एनर्जी पार्क, कच्छमधे विकसित केलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.)
याप्रसंगी प्रधानमंत्र्यांनी १३ ग्रीनफील्ड स्मार्ट औद्योगिक वसाहतींचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन केलं. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी, करण अदानी, बी के गोएंका उपस्थित होते. त्याआधी प्रधानमंत्र्यांनी राजकोट इथं, व्हायब्रंट गुजरात व्यापार प्रदर्शनाचं उद्घाटन केलं.
ते आज दुपारी सोमनाथ इथं सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. सोमनाथचा इतिहास हा विजय आणि पुनर्निर्माणाचा तसंच आपल्या पूर्वजांच्या पराक्रम, त्याग आणि बलिदानाचा इतिहास आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. आपल्या पूर्वजांनी प्राणाचं बलिदान देऊन सोमनाथ मंदिराचं रक्षण केलं, असं प्रधानमंत्री म्हणाले.
होल्ड बाईट मोदी
त्याआधी सोमनाथ स्वाभिमान पर्वाचा भाग म्हणून भव्य शौर्ययात्रा निघाली. गुजरातच्या विविध भागातून आलेले १०८ अश्व आणि डमरू वादक पथक या यात्रेत सहभागी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फुलांनी सजवलेल्या वाहनावर आरूढ होत यात्रेचं नेतृत्व केलं. रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या भक्तगणांनी यात्रेवर पुष्पवर्षाव केला आणि हर हर महादेवचा जयघोष केला. यात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी उभारलेल्या व्यासपीठांवर देशभरातून आलेल्या कलाकारांनी नृत्याचं सादरीकरण केलं.