राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाला आजपासून सुरुवात झाली. हा पुतळा ८३ फूट उंच असेल. हा पुतळा वर्षानुवर्षे टिकेल असा विश्वास शिल्पकार अनिल सुतार यांनी व्यक्त केला. एका महिन्यात पुतळ्याचं काम पूर्ण होईल.