छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला असून या निर्णयाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. याबाबतचं राजपत्र लवकरच जारी होईल. वेल्हे तालुक्यातल्या ७० पैकी ५८ ग्रामपंचायती आणि पुणे जिल्हा परिषदेने हा नाव बदलाचा ठराव मंजूर केला होता.
Site Admin | August 21, 2025 3:18 PM | Rajgad
वेल्हे तालुक्याचे नाव आता ‘राजगड’
