राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्य सचिवांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्र सरकारला पाठविला होता. या प्रस्तावाला केंद्रानं मान्यता दिली.
यामुळे राजेश कुमार यांना १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ असा वाढीव काळ मिळणार आहे. नियमित वेळापत्रकानुसार ऑगस्ट अखेरीस ते सेवानिवृत्त होणार होते. १९८८ बॅचचे सनदी अधिकारी असणाऱ्या राजेश कुमार यांनी ३० जून २०२५ रोजी राज्याच्या मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली होती.