January 24, 2025 6:42 PM | Rajbhavan Mumbai

printer

राजभवनात उत्तर प्रदेश तसंच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत आज मुंबईत राजभवन इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेश तसंच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या राज्यांचं लोकजीवन आणि संस्कृतीचं, ताल आणि नृत्याच्या माध्यमातून जिवंत दर्शन घडवल्याबद्दल राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाला २५ हजार रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं. याशिवाय दोन महाविद्यालयांना देखील बक्षीस जाहीर करण्यात आलं.