Rajasthan : सरकारी उच्च प्राथमिक शाळेची इमारत कोसळून ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात सरकारी उच्च प्राथमिक शाळेची इमारत कोसळून पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर २०पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले. गावकऱ्यांनी तातडीनं जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केलं. गंभीर जखमी असलेल्या १० विद्यार्थ्यांना झालावार वैद्यकीय रुग्णालयात हलवल्याची माहिती झालावारच्या पोलीस अधीक्षकांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, तसंच राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करायची घोषणा शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.