डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राजस्थानमध्ये रस्ते अपघातात १५ हून अधिक जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये, फलोदी जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात 15 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. जोधपूरमधून यात्रेकरूंना घेऊन निघालेली बस, एका थांबलेल्या ट्रकला धडकल्यानं हा अपघात झाला. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं असून, जखमींच्या योग्य उपचाराची दक्षता घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.