डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

रस्ते अपघातात तेलंगणामध्ये १९, तर राजस्थानमधे १४ जणांचा मृत्यू

तेलंगणामध्ये रंगारेड्डी जिल्ह्यात चेवेल्लाजवळच्या मिर्जागुडा-खानापूर रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघातात एकूण १९ जणांचा मृत्यू झाला. विकाराबाद-हैदराबाद मार्गावर एका ट्रकनं एका दुचाकीच्या मागून पुढं जाण्याचा प्रयत्न करताना आरटीसी बसला धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

 

अपघाताची माहिती मिळण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारनं हैदराबादमध्ये एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. विशेष वैद्यकीय पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. 

 

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.