डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राजस्थानमधल्या धौलपूर इथं राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू

राजस्थानमधल्या धौलपूर इथं राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलांची संख्या अधिक आहे. लग्नसमारंभाहून परत येत असताना बस आणि रिक्षा एकमेकांवर धडकल्यामुळे हा अपघात झाला. बस चालक आणि वाहक दोघांची स्थिती गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.