राजस्थानमध्ये जैसलमेरजवळ काल एका वातानुकूलित बसला आग लागून झालेल्या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला तर १५ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी अनेकजण ७० टक्क्यांपर्यंत गंभीर भाजले आहेत.
शॉर्ट सर्किटमुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली असून जखमींना उपचारासाठी जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून केंद्र सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.