October 14, 2025 8:13 PM | Rajasthan

printer

राजस्थानमध्ये बसला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू, १४ जखमी

राजस्थानमध्ये जोधपूर महामार्गावर एका खासगी बसला लागलेल्या आगीत किमान १० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती आहे, तर १४ पेक्षा जास्त जण गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींवर जोधपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि घटनास्थळाला भेट दिली. उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं.