February 13, 2025 7:58 PM | Rajan Salvi

printer

राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते राजन साळवी यांनी पक्षातल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. ज्या पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, त्या पक्षाला सोडून जाताना दुःख होत असल्याचं मनोगत यावेळी राजन साळवी यांनी व्यक्त केलं. २०१४मध्ये युतीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपलं नाव मंत्रिपदासाठी सुचवलं होतं, मात्र विनायक राऊत यांच्यामुळे ती संधी गेल्याचा आरोप साळवी यांनी केला. 

 

दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक रवी डोळस यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. पक्षाने एका अधिकृत पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.