डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 2, 2025 8:05 PM | raj thakre

printer

उद्योगांना जमिनी द्याव्याच लागल्या तर त्या उद्योगात भागिदार घेण्याबाबत ठामपणे सांगा-राज ठाकरे

उद्योगांना जमिनी विकू नका, आमच्या जमिनी घ्यायच्याच असतील तर आम्हाला उद्योगात पार्टनर म्हणून घेण्याबाबत ठामपणे सांगा, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलत होते. भाषा आणि जमिनी जपल्या पाहिजेत, एकदा तुमची भाषा आणि जमीन गेली की तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही स्थान नाही असं ते म्हणाले. सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयावर तसंच जनसुरक्षा कायद्यावर ठाकरे यांनी जोरदार टीका केली. मराठी माणसाच्या थडग्यावर उदयोग उभे रहायला देणार नाही असं त्यांनी सांगितलं.

 

राजकारण मराठी माणसांच्या हाती रहावं, कष्टकरी, शेतकरी वर्गाला न्याय मिळावा यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे असं आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं.

 

तर, सध्याचे राज्यकर्ते लोकशाही नष्ट करत असून त्यांना विरोध करण्यासाठी सर्व पुरोगामी शक्तींची भक्कम एकजूट करण्याची गरज शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.