August 18, 2024 4:04 PM

printer

राज्यातील काही भागात जोराच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा

 
राज्यात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी आज विजा आणि जोराच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांत पश्चिम बंगालसह हिमालयाशी जोडलेला भाग ईशान्येकडील राज्ये तसंच केरळ, तमिळनाडु आणि लक्षद्वीपमध्येही तीव्र स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.