May 30, 2025 7:49 PM

printer

आसामला उद्यापर्यंत रेड अलर्ट जारी

नैऋत्य मान्सूनमुळे ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आसाममध्ये, राजधानी गुवाहाटीत पुराचा धोका निर्माण झाला आहे, ब्रह्मपुत्रा आणि इतर प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत, यामध्ये भरालू आणि बहिनी नद्यांचा  समावेश  आहे.

 

राज्य आपत्ती प्रतिसाद दलानं गुवाहाटीच्या अनेक सखल भागात रहिवाशांना मदत करण्यासाठी रबर बोटी तैनात केल्या आहेत. धुबरी, दक्षिण सलमारा-मानकाचर, गोलपारा आणि दिमा हासाओ या जिल्ह्यांमध्ये अचानक पूर, भूस्खलन आणि गंभीर पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं उद्यापर्यंत आसामला  रेड अलर्ट जारी केला आहे,