नैर्ऋत्य मोसमी पावसानं बंगालच्या उपसागरातला दक्षिण भाग व्यापला असून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात तो पोहोचला आहे. पुढच्या ३-४ दिवसात मान्सून आणखी पुढं सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, पडण्याची शक्यता हवामान विभागाने वरतवली आहे. राज्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात पहाटे पावसाच्या सरी कोसळल्या.
सांगली जिल्ह्यातील वाळवा, मिरज, तासगाव, खानापूर, पलूस, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला.