हिमाचल प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊसाचा जोर सुरूच आहे, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूर, ठिकठिकाणी पाणी साचणं आणि भूस्खलनामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्य आपत्कालीन केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे दोन राष्ट्रीय महामार्ग आणि 482 रस्ते वाहतूकीसाठी बंद आहेत.
अनेक भागातील वीजपुरवठाही प्रभावित झाला आहे, 941 जनित्र आणि 95 पिण्याच्या पाण्याच्या योजना विस्कळीत झाल्या आहेत. हवामान खात्याने या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. दहा जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासांत बिलासपूर, हमीरपूर, कांगडा, किन्नौर, कुल्लू, मंडी, शिमला, सिरमौर, सोलन आणि उना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. या पार्श्वभूमीवर सात जिल्ह्यांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे