पूर्व आणि द्वीपकल्पीय क्षेत्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम इथंही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मध्य प्रदेशाच्या पूर्व भागात तसंच छत्तीसगड, बिहार आणि ओदिशा इथं आज आणि पुढच्या तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटकचा दक्षिण भाग, आंध्र प्रदेशाची किनारपट्टी, तेलंगणा इथंही उद्यापर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात आज आणि उद्या मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, केरळमध्येही आजपासून पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये ही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. केरळमधील चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.