डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 29, 2025 3:35 PM | Maharashtra | Rain

printer

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम

   राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. बीड जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं नुकसान झालं असून, प्रशासनानं गाव पातळीवर पंचनामे करून आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अनेक ठिकाणी पुराचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

 

कोल्हापुरातही राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग आज वाढवला, आज दुपारी धरणाचा अणखीन एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला. लातूरमध्ये अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

 

नांदेडमध्ये विष्णूपुरी धरण प्रकल्पात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडले असून,  गोदावरी नदी पात्रात १ लाख २९ हजार ७४३ क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. पोचमपाड धरणातूनही ५ लाख क्युसेक विसर्ग सुरु आहे. 

 

   परभणीत गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. पावसामुळे अनेक ठिकाणचे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं नांदेड विभागातल्या गाड्या पर्यायी मार्गानं वळवल्या आहेत. गंगाखेड इथला मासोळी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असल्यानं, आसपासच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. 

 

अकोल्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी निवासी वसाहती पाण्याखाली गेल्या आहेत. पावसाचा जोर वाढल्यानं हिंगोलीत वसमत आणि औंढा तालुक्यातल्या, तर यवतमाळमध्ये उमरखेड इथल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

 

वाशीमध्येही नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. सोंडा ते अनसिंग दरम्यान पुलावरून पाणी जात असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.