May 14, 2025 12:40 PM | Rain

printer

राज्यात विविध ठिकाणी हलका पाऊस झाल्यानं तापमानात घट

मुंबई , ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये काल दिवसभर ढगाळ हवामान होतं. काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाल्यानं तापमानात घट झाली. मुंबईच्या साकीनाका परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. येत्या चार- पाच दिवसांत मुंबई शहर आणि आसपास ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठाणे , रायगड जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. इथे येत्या शुक्रवारपर्यंत गडगडाटासह विजा चमकण्याचा तसंच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वेगवान वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.