भारतीय रेल्वेने ‘राउंड ट्रिप पॅकेज’ नावाची योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत प्रवाशांना परतीच्या प्रवासात तिकिट दरात २० टक्के सूट दिली जाईल.
दोन्ही बाजूंच्या प्रवासाचं आगाऊ तिकीट घेतल्यावरच ही सूट लागू होईल, तसंच या तिकिटावर संबंधित प्रवाशा व्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती प्रवास करू शकणार नाही, असं रेल्वे मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजने अंतर्गत आरक्षित केलेलं तिकीट रद्द केल्यावर त्याचा परतावा दिला जाणार नाही.