भारतीय रेल्वेकडून जाहीर करण्यात येणारा आरक्षण तक्ता आता रेल्वेगाडी निघण्याच्या आठ तास आधी तयार करण्यात यावा अश्या सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमंडळाला दिल्या आहेत. हा नियम टप्प्याटप्प्याने लागू होईल. यामुळे आरक्षणाच्या प्रतिक्षायादीत असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळेल आणि प्रवासाची इतर पर्यायांचा विचार करता येईल. अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली. भारतीय रेल्वे पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर फक्त अधिकृत वापरकर्त्यांनाच तत्काळ तिकिटे आरक्षित करण्याची परवानगी देईल. या वर्षी जुलैच्या अखेरीस तात्काळ आरक्षणासाठी ओटीपी-आधारित प्रमाणीकरण केले जाईल. अशी माहितीही मंत्रालयानं दिली.
Site Admin | June 30, 2025 1:32 PM | Ministry of Railways
रेल्वेचा आरक्षण तक्ता आता रेल्वेगाडी सुटण्याच्या 8 तास आधी तयार करण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या सूचना
