July 31, 2024 1:15 PM

printer

बुलेट रेल्वे प्रकल्पाचं काम वेगाने पुढे जात असल्याची रेल्वेमंत्र्यांची लोकसभेत ग्वाही

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच प्रश्नोत्तरांचा तास पुकारण्यात आला. बुलेट रेल्वे प्रकल्पाचं काम वेगाने पुढे जात असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली आहे.

 

या प्रकल्पाचा एक भाग म्हणून देशात पहिल्यांदाच समुद्राच्या खाली ३० मीटरवर २१ किलोमीटरचा बोगदा बांधला जात असल्याची माहिती प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना उत्तरादाखल वैष्णव यांनी दिली. मेट्रो प्रकल्पासाठीचं ३२० किलोमीटर पायाबांधणीचं काम पूर्ण झालं असून मेट्रो हा तंत्रज्ञानाभिमुख प्रकल्प असल्याचंही ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.