डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

रेल्वेमंत्र्यांनी केली अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाची पाहणी

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज अहमदाबाद रेल्वे स्थानकाला भेट देऊन तिथं सुरु असलेल्या पुनर्विकास कामाची पाहणी केली. अहमदाबाद रेल्वे स्थानकाचा विकास अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं केला जात असून येत्या तीन – साडे तीन वर्षात हे काम पूर्ण होईल, असं वैष्णव यांनी सांगितलं.

गुजरातच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, गुजरातमध्ये लवकरच रेल्वे मार्गाचं १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण होईल, असं ते म्हणाले. यावर्षीच्या अर्थसंकल्पात गुजरातसाठी १७ हजार १५५ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.