डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नाशिकमधे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रेल्वेमंत्र्यांचा आढावा

नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठीच्या रेल्वेच्या योजनांचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी आढावा घेतला. प्रयागराज इथं झालेल्या महाकुंभच्या अनुभवावरून लगतच्या सर्व स्थानकांवर पुरेशा सुविधा विकसित करण्याची सूचना वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना  केली.

 

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नाशिक परिसरातल्या नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच प्रमुख स्थानकांवरून प्रवासी वाहतुकीचं व्यवस्थापन केलं जाईल. यासाठी या स्थानकांवरच्या प्रस्तावित कामांचा खर्च एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल.