महाराष्ट्रात रेल्वेमार्गाचं जाळं विकसित करणं आणि वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध-रेल्वेमंत्री

महाराष्ट्रात रेल्वेमार्गाचं जाळं विकसित करणं आणि वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. अर्थसंकल्पात वाढीव तरतूद, प्रकल्पांची जलद अंमलबजावणी, सर्वसमावेशक स्थानकं पुनर्विकास प्रकल्प यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात रेल्वेचा चांगला विकास झाल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. २००९ ते २०१४ या कालावधीत रेल्वेनं राज्यातल्या पायाभूत सुविधांसाठी १ हजार १७१ कोटी रुपयांची तरतूद केली होती, २०२५-२६पर्यंत त्यात २० पट वाढ होऊन ही तरतूद २३ हजार ७७८ कोटी रुपयांवर गेली असल्याचं ते म्हणाले.