मुंबई उपनगरी भागात वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि भविष्यात प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ५२ हजार ७२४ कोटी रुपये खर्चाच्या मुंबई शहरी प्रवास प्रकल्पाच्या तीन टप्प्यांना मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. यात पहिल्या टप्प्यासाठी ८ हजार ८७ कोटी, दुसऱ्या टप्प्यासाठी १० हजार ९४७ कोटी, तर तिसऱ्या टप्प्यात ३३ हजार ६९० कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आल्याचं लेखी उत्तरात म्हटलं आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत राज्यातल्या १३२ रेल्वेस्थानकांचा विकास करण्यात येत असून याच्या पहिल्या टप्प्यात १५ स्थानकांचं पूर्ण झाल्याचंही उत्तरात नमूद केलं आहे.
Site Admin | July 25, 2025 9:04 PM | Railway Minister Ashwini Vaishnav
मुंबई शहरी प्रवास प्रकल्पाच्या तीन टप्प्यांना रेल्वे मंत्रालयाची मान्यता
