डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुंबईत उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावरचा मेगाब्लॉक रद्द

मुंबईत उद्या रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर दिवसभर कोणाताही मेगाब्लॉक नसल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. उद्या भाऊबीज साजरी करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुरळीत होणार आहे. 

 

पंरतु आज मात्र मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा ऐन दिवाळीच्या दिवसात विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना सिग्नल न मिळाल्यानं वाहतूकसेवा  विस्कळीत झाली असून लोकल गाड्या २० ते २५ मिनिटं उशिरानं धावत आहे. तर गर्डरचं काम सुरू असल्यामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूकसेवाही धीम्या गतीनं सुरू असून लोकल गाड्या १० ते १५ मिनिटं उशिरानं धावत आहे.